लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या प्रकरण




भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली कल्याणात पीडित कुटुंबीयांसह पोलिसांची भेट


कुटुंबियांच्या माहितीनुसार तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे.. या दिशेने तपास व्हावा... भाजप नेत्या चित्र वाघ यांची मागणी


: लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती .या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली .आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयासह पोलिसांची भेट घेतली .त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडितेवर लैगिंक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मुलीच्या कुटुबीयांच म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली गेलीय त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी वाघ यांनी केली .


 एका  तरूणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सात तरुण गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर  लैंगिक अत्याचार करत होते  .या गैरकृत्यमध्ये एका तरुणीचा सहभाग होता .या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली .ही घटना उघडकीस आल्याने शहर हादरले होते .  कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती .या प्रकरणी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याण मध्ये पीडित कुटुंबीयांची त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना  वाघ यांनी पिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच 12 वीत 71 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती. या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यापैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.दुसऱ्या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. इस्टाग्रामवरील एपवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात बडय़ा घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी . तिचे कुंटुंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. आठ दिवसांनी पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले.




बाईट- चित्रा वाघ ( भाजप प्रदेश उपाध्यक्ष )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या