डोंबिवली ( शंकर जाधव) रस्त्यावरुन जात असताना एक भले मोठे झाड कोसळल्याने आई आणि तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यात आईच्या डोक्याला तर मुलाचा उजवा पाय फॅक्चर झाला. त्या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात राहणारी सुनिता भांगरे ही महिला तिचा मुलगा भाविक याला शाळेतून घेण्यासाठी गेली होती. शाळेतून मुलाला घेऊन येत होती. आई सुनिता व मुलगा भाविक (8 ) रस्त्यावरुन जात असताना ठाणगेवाडी परिसरात भले मोठे झाड अचानक कोसळले. यात आई आणि मुलगा दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरीकांनी झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढले. दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रस्त्याच्या बाजूला कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे महापालिकेने तात्काळ हटविली पाहिजेत. अन्यथा पावसाळयात मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

.jpeg)

0 टिप्पण्या