जगाची रितच न्यारी


कर्तृत्वान व्यक्तीला हेरून सन्मानाने जेव्हा मिळतो पुरस्कार।

तरीही संशयाने काही लोक त्याचा करती तिरस्कार।।

 जगाची रितच न्यारी, गरीब पंडित असून ही काही लोक करती धिक्कार।।१।। 


खरे असूनही साधू लोक म्हणती संधी साधु।

कळेना कोणा वैराग्याचे जीवन, म्हणून म्हणती भोंदू।

 जगाची रितच न्यारी, खरा साधू असूनही काही लोक करती धिक्कार।।२।। 


जगात आईची महती थोर समजली जाते।

पण सोबत बापाचेही तेवढेच महान कर्तृत्व असते।

 जगाची रितच न्यारी, काही लोक बापाचे जाणत नाहीत उपकार।।३।। 




जगात पैसेवाले श्रेष्ठ, बाकीचे सारे कनिष्ठ।

ही वृत्ती पोफावते त्यावेळी ओढवते अनिष्ट।

 ही जगाची रितच न्यारी, पाहिजे संतोष तर घ्यावा संत-महतांचा आधार।।४।। 




 कवी: सागोसुत-हरिसंतोष 

संतोष सावित्रीबाई गोपाळराव सावंत

दि. 16 जून 2022

संध्याकाळी ४. ३० ते ५ वाजता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या