स्केटिंग खेळाडूंचा 96 तास स्केटिंग चालवण्याचा विक्रम



डोंबिवली  ( शंकर जाधव )बेळगावच्या शिवगंगा स्केटिंग क्लब येथे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पार पडलेल्या स्केटिंग विक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील मीरारोडला असलेल्या स्केटलाईफ क्लबच्या 33 खेळाडूंनी 96 तास स्केटिंग चालवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


     रोट्रॅक क्लबतर्फे बेळगाव येथे नुकतेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी 96 तासाचे लाजेस्ट स्केट मोटो फार्मेशन स्केटिंगचा विक्रम करण्यात आला. या रेकॉर्डसाठी संपूर्ण भारतातून 496 खेळाडू सहभागी झाले होते. यात ठाणे जिल्ह्यातील 33 खेळाडूंचा समावेश होता.

या सर्व खेळाडूंचा ठाणे जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक संतोष मिश्रा, प्रफुल खरात आणि अमित मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.


     अयान नेत्र, प्रद्युन रेड्डी, रितेश रेड्डी, जिया जियाल, अजिता जियाल, दिव्यांश जियाल, एम. विश्वकर्मा, अर्जित जोयाशी, अरमान सय्यद, आद्य बरनवाल, अर्जुन कामठ, आध्या कामठ, अर्णव थोरात, ऋषित तिवारी, स्वस्वत परीदा, अनिया भारती, देवांश खन्ना, अभिनव नवरी, अक्ष्य नवरी, दियान सैनी, तनिश गुच्छायत, अंश साळुंखे, अंश वर्मा, अन्विता बुटे, तेजस मोहंती, हर्षिता पाष्टे, हृदान जोशी,चाहत पायणे, प्रज्ञा पायने, वीर गजरा, मयांक चौधरी, जयेश चौधरी, सर्वेश कोचरेकर विक्रमवीरांचा यात समावेश होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या