पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी..
कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम यांनी कसारा घाटातील भीषण पाणीटंचाई असलेल्या बिवल वाडी गाव जो पर्यंत पाणीटंचाई मुक्त होत नाही तोपर्यंत हे गाव दत्तक घेतलेले आहे.या गावातील लोकांना बाराही महिने पाणी मिळावे , त्यांच्या विहरीचे बंद झालेले पाण्याचे झरे पुन्हा जिवंत व्हावे व विहरीमधील पाणी वर डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत पोहचावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अनेक लोकांच्या सहकार्याने श्रमदान करून गॅबियन बंधारे बांधणे / जैविक शुध्दीकरण पद्धतीने बायो कॅटलीस ईको चीप )चा वापर करणे / पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून चर मारणे / रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे या कामाचा शुभारंभ जलतज्ञ गुणवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली इतिहास कालीन विहीर व वर डोंगरावर असलेल्या कसारा घाटातील बिवळवाडी गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह अनेकांनी सदर जागेची पाहणी केली.तेथे चालू असलेले काम बघून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त करत कौतुक केले. जैविक शुध्दीकरण पद्धत समजून घेण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून माझी वेळ घेऊन लवकरच मंत्रालयात मला भेटायला या म्हणून सांगितले.
सदर कामासाठी खासदार डॉ. शिंदे व मनसे आमदार प्रमोद ( राजु) पाटील यांनी केलेल्या मदती संदर्भात देखील पर्यावरण मंत्र्यांना माहिती देण्यात आली. मुकेश झा व मुरलीधर पणीकर यांनी देखील या गावासाठी मदत केली.कल्याण पश्चिम ( खडकपाडा ) येथे राहणाऱ्या चांदवडकर मावशी यांचा ५ मे रोजी वाढदिवसणानिमित्त आदिवासी लोकांची पाण्याची तहान भागेल म्हणून ३ टँकर पाणी या विहरी मध्ये सोडले.
श्रमदान करण्यासाठी कल्याण मधून आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष अण्णा रोकडे, माजी नगरसेवक कैलास शिंदे व त्यांचे सहकारी, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर , मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार किरण सोनवणे,कामेश जाधव ,केतन रोकडे, विवेक जगताप, उदय कांबळे,रमेश खराटे, बाळू साठे, संजय ठाणगे, निखिल शिर्के,सुदर्शन चिकने, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले , राजू तिवारी , चेतन नायडू, योगेश बारसकर ,बंटी तरे ,मुकेश झा , प्रकाश तिवारी ,जितेंद्र तिवारी ,चीलेंद्र नलावडे, दिलीप पाटील ,पंकज निकम, तनय निकम, प्रशांत मोरे व लाडू व इतरही मित्र व सहकाऱ्यांनी या भीषण पाणीटंचाई असलेल्या गावातील लोकांना पाणी मिळावे म्हणून भर उन्हात काम केले.सर्वांचे नितीन निकम यांनी आभार मानले आहेत.

.jpeg)
0 टिप्पण्या