चेंबूरमधील सुभाषनगर वसाहत पुनर्विकासाच्या हालचाली सुरू

* बुधवारी म्हाडाने बोलवली रहिवाशांची खास बैठक



मुंबई- गेल्या १५ वर्षांंपासून विकासाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर वसाहतींचा पुनर्विकास करण्याच्या हालचाली आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारण म्हाडानेच आता स्वतः पुढाकार घेत संबंधित विकासक आणि रहिवाशांची एक खास बैठक बुधवार ११ मे  रोजी बोलावली आहे.


मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे निवासी कार्यकारी अभियंता प्रकाश सानप यांच्या सहीने या  बैठकी संदर्भात संबधित विकासक आणि संस्थांचे सभासद यांना नोटीस पाठवली आहे.त्यानुसार वांद्रे  पूर्व कलानगर येथील गृहनिर्माण भवनातील तिसर्‍या मजल्यावरील गुलझारीलालनंदा सभागृहात बुधवार ११ मे रोजी सकाळी ११.४५ वाजता ही बैठक होणार आहे. तरी ज्या संस्थेच्या संबंधित विकासकाबाबत काही तक्रारी किंवा सुचना असतील त्या संस्थेच्या सर्व अध्यक्ष आणि सचिव यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे. चेंबूरमधील सुभाषनगर वसाहतीचा पुनर्विकास करण्याचे काम ज्या विकासकाला देण्यात आले आहे.त्याने हे काम अर्धवट स्थितीत केले असून  अनेकांना अजून नवीन सदनिकेचा ताबा मिळालेला नाही.तर अनेकांना कायदेशीर पूर्तता न करता आणि सोयी सुविधांचा अभाव असताना ताबा दिला आहे. तर काही संस्थेच्या  भूखंडावर आता नवीन विकास आराखडा-२०३४ अन्वये डी.पी.आर.जी.चे आरक्षण दाखविण्यात आल्याने त्यांचा भूखंड त्यांच्या ताब्यात नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या