अक्षयतृतीया तिथी महत्तम,
साडेतीन मुहूर्ताचा मुहूर्त उत्तम.
हयग्रीव, नरनारायण आज प्रकटले,
परशुराम अवतार विष्णूनी धरिले.
त्रेता युगाचा प्रारंभही आज,
महाभारताचा शुभारंभ ही आज.
धरतीवर पवित्र गंगेचे आगमन,
कृष्ण सुदामाचे सुंदर मिलन.
कलहकालाचा अंत आणि सतयुगाचा प्रारंभ झाला,
एका क्षणाने मुहूर्त साधुनी साडेतीन मुहूर्तात गणला.
आजच्या दिनी दान,हवन,जप यांचा लोप होत नसे,
म्हणूनच हिला मुनींनी अक्षयतृतीया असे संबोधिले.
पितरांचा आत्मा शांत करण्या ब्राह्मणाला दान करतात,
पितरांचे स्मरण करून प्रतिमा त्यांची पूजतात.
विष्णुसह मनोभावे
पूजता वैभवलक्ष्मीला,
लक्ष्मीतत्वांचा लाभच
होत असे उपासकाला.
अक्षय असे काहीतरी असावे आयुष्यात,
अक्षय असे काहीतरी
रहावे जीवनात.
पुण्य कमवावे जे राही अक्षय,
माणुसकीचे नाते जपावे अक्षय.
आनंदाची उधळण अक्षय,
नाते जोडावे जे राही अक्षय.
ईष्टदेवतेचे पूजन करुनी
सुखसमृद्धी प्राप्त करूया,
अवचित्य साधुनी ह्या अक्षय तृतीया
मुबलक पावसासाठी पाण्याचा कलश पूजया.
सौ.अनिता नरेंद्र गुजर
ठाणे जिल्हा अध्यक्षा
8097524197


0 टिप्पण्या