डोंबिवलीत १३ वर्षीय मुलाला रिक्षाचालकाने लुटले
डोंबिवली ( शंकर जाधव ) एका १३ वर्षीय मुलाला रिक्षाचालकाने लुटल्याची घटना बुधवारी १८ तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ परिसरात घडली.विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री लुटारू रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भोईर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भोईर यांचा १३ वर्षीय मुलगा साई हा ट्युशनसाठी डोंबिवली पश्चिमेकडील भाग्यशाळा मैदानजवळ गेला होता.घरी परत असताना साई यांनी भागशाळा मैदानजवळ एका रिक्षाचालकाला विचारले. देवी चौकातील राममंदिर येथे शेअरचे भाडे ठरल्यावर साई त्या रिक्षात बसला.मात्र रिक्षाचालकाने डोंबिवली पश्चिमेकडे फिरवले.रात्री आठ वाजता रिक्षाचालकाने बावनचाळीत नेले. बावनचाळीत एका अंधाऱ्या कोपऱ्यात साईला नेले आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवले. घाबरलेल्या साईने घरी गेल्यावर घरच्यांना घडलेली घटना सांगितली.विष्णुनगर पोलीस लुटारू रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.


0 टिप्पण्या