नाहीतर डोंबिवलीत सर्व ज्वेलर्स बंद करणार..





डोंबिवली ( शंकर जाधव) १७ मे रोजी भरदिवसा डोंबिवलीतील तारकनाथ मन्ना या ज्वेलर्स दुकानदारावर अज्ञात इसमाने दुकानात घुसून चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.दोन दिवस उलटूनही हल्लेखोराला अटक झाली नाही.यावर डोंबिवलीतील सर्व ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सहा दिवसात आरोपीला अटक केली नाही तर डोंबिवलीत सर्व ज्वेलर्स बंद करणार करू असा इशारा डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन यांनी दिला आहे.


  याबाबत डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन म्हणाले, डोंबिवलीतील सर्व ज्वेलर्स असुरक्षित असून भीतीचे वातावरण पसरले आहे.फक्त ज्वेलर्सच सुरक्षित नाहीत तर नागरिकही सुरक्षित नाहीत.आम्ही ज्वेलर्सनी दुकानाच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही लावले आहेत. तरीही हल्ले होत आहेत. अश्या परिस्थिती असे हल्ले होत राहिले तर सरकारने यावर योग्य ती पावले उचलली पाहिजेत. लवकरात लवकर हल्लेखोराला अटक झाली नाही तर  डोंबिवलीत सर्व ज्वेलर्स बंद करू असा इशारा दिला. याबाबत डोंबिवली सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी विचारले असता ते म्हणाले, या घटनेत तारकनाथ मन्ना यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरु आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र या हल्ल्यात आरोपीचा उद्देश काय आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही.


**************************************************

डोंबिवलीतील ज्वेलर्स घेणार गृहमंत्र्यांची घेणार भेट :

डोंबिवलीतील असुरक्षित वातावरणबाबत आणि तारकनाथ मन्ना या ज्वेलर्स दुकानदारवर झालेल्या हल्लाबाबत आरोपी आद्यप अटक का नाही झाली नाही याबाबतही गृहमंत्र्यांना माहिती देणार आहेत असे डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन यांनी सांगितले.
**************************************************


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या