शामलाक्षरी ही साहित्य विश्वाला मिळालेली नवी देणगी आहे .शामलाक्षरी काव्य रचना लोकप्रिय व्हावी. गिरीश प्रभुणे



पिंपरी- शिवतेजनगर, चिंचवड येथे शामलाक्षरी काव्यसमूह, कमलविश्व राज्य स्पर्धा समूह, लालित्य नक्षत्रवेल कथासमूह यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी गिरीश प्रभुणे म्हणाले-- 

'शामला पंडित यांनी शामलाक्षरी काव्य रचनेचा नवीन प्रकार निर्माण केला आहे.तो अधिक लोकाभिमुख व्हावा, लोकप्रिय व्हावा. नवीन कलाकृती रुजण्यासाठी खूप वेळ लागतो,परंतु शामलाक्षरी हा काव्य प्रकार अतिशय कमी वेळामध्ये लोकप्रिय होत आहे,ही चांगली बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी ओवी निर्माण केली.महात्मा फुले यांनी अखंड रचना निर्माण केली त्याचप्रमाणे शामलाक्षरी छंदबद्ध नव काव्यनिर्मिती ही साहित्य विश्वाला मिळालेली नवी देणगी आहे.' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.  अतिशय कमी कालावधीत शामलाक्षरी  या साहित्य प्रयोगाला कवींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 


 चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमात गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते "उन्मेष" हा शामलाक्षरी प्रातिनिधिक काव्य संग्रह, शब्दगंध प्रातिनिधिक कथासंग्रह, शब्दांगण शामलाक्षरी चारोळी संग्रह आणि ई- बुक शामलाक्षरी चारोळीसंग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी ग्रामीण कथाकार बबन पोतदार, नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रसाद दीक्षित, कल्याण पानगे, प्रणाली प्रकाशनाच्या कु .प्रणाली पंडित उपस्थित होते . ई बुक चारोळी संग्रहाच्या शुभांगी तपस्वी, "शब्दांगण" -  सुनिता वैद्य - ग्राफिक्स अंगद दराडे" यांनी व "शब्दसरी" शुभांगी तपस्वी -ग्राफिक्स प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट ई बुक निर्मिती केली.  नारायण बहिरवाडे यांनी 'नवनिर्मिती दैवी देणगी आहे.असे गौरवोद्गार काढले.' "शामलाक्षरी नव काव्यप्रकार मराठी भाषेच्या विकास व वृध्दीसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे .एक शब्द भिन्न अर्थ असलेली काव्यरचना मनास भावते . अनेक शब्दाची माहिती होते . मराठी भाषेबद्दल आवड , वाचन संस्कृती दृढ होण्यास प्रेरणादायी आहे.असे मत सुनिता वैद्य यांनी व्यक्त केले." .अशोक पानगे , दिलासा संस्थेचे सुरेश कंक,नंदकुमार मुरुडे, राज अहेरराव, अॅड. अंतरा देशपांडे,ह.भ.प.अशोक गोरे महाराज, मा . शोभाताई जोशी , रजनी अहेरराव, वर्षा बालगोपाल, दीक्षित बंधू भगिनी , साहित्य , शैक्षणिक , कला क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.संपादिका शामलाताई पंडित - दीक्षित यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले .  सुप्रिया लिमये यांनी शामलाक्षरीचे गायन केले. तानाजी एकोंडे,  श्रीकांत दीक्षित यांनी पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केले. कवयित्री डॉ . शितल मालुसरे यांनी सुंदर प्रस्तावना दिली आहे . कवयित्री नंदा कोकाटे ( मुंबई )कवयित्री वैशाली पडवळ,कवयित्री शुभांगी तपस्वी,कवयित्री मार्या देठे,कवयित्री सीमा कुलकर्णी,कवयित्री प्रियंका मोरे ( मुंबई ) ,कवयित्री निलिमा जोशी, मा . शारदा पानगे यांनी पुस्तकास  शुभेच्छा दिल्या आहेत . स्वामी समर्थ विरंगुळा केंद्र चे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी साहित्य निर्मितीस सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . 

सौ . शामला पंडित ( दीक्षित ) प्रणाली प्रकाशन चिंचवड ,यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले . सविता वेदपाठक यांनी सूत्रसंचलन केले .  निलेश  महागावकर यांनी आभार मानले.

वृत्तांकन-- शामला पंडित-दीक्षित

8208702907

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या