डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीजवळील ठाकुर्लीजवळील जुन्या हनुमान मंदिराजवळील एका इमारतीच्या पार्किंग जागेत एका तरुणाचा मृतदेह सापडला. बुधवारी सकाळच्या सुमारास इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनात ही बाब आल्यावर त्यांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना माहिती दिली.दोन दिवसांपूर्वी हरविल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली होती.
पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील नेहरू रोड वरील विजयदास सोसायटीच्या ब्लॉक नंबर २१ मध्ये चेतन प्रदीप निकम हे राहत होते.दोन दिवसांपासून ते घरी न असल्याने रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी हरविल्याची नोंद केली होती. बुधवारी सकाळी ठाकुर्ली चोळे येथील जुन्या हनुमान मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या तपासात हा मृतदेह चेतन प्रदीप निकम याचा असल्याचे सांगितले. मृत्यूदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रथम पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र मृतदेहाच्या नातेवाईकांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करावे अशी मागणी केल्याने मृतदेह ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत असल्याचेही सांडभोर यांनी सांगितले.
**************************************************


0 टिप्पण्या