डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस व वाॅर्डन नेमावे अशी मागणी शहर कोळसेवाडी शहर वाहतूक उपविभागाकडे डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेने केली होती. आपल्या मागण्या पूर्ण ज झाल्यास लाक्षणिक उपोषण करू असा इशाराही संघटनेने दिला होता.यावेळी नंदू परब, दत्ता माळेकर,संजय देसले, प्रमोद गुरव, संतोष आतकरे, रवी जाधव, जयनाथ यादव, रवी साळवे, सोनू मेहरोलिया आदि उपस्थित होते.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली.दावडी पेट्रोल पंप, सोनारपाडा डीएनएस बँक, अन्नपूर्ण हॉटेल चौक ( सोनारपाडा ) , साईबाबा मंदिर सागाव याठिकाणी वाहतूक पोलीस व वाॅर्डन नेमण्यात येईल असे लेखी पत्र कोळसेवाडी शहर वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक आर.व्ही.क्षीरसागर यांनी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले.

.jpeg)
0 टिप्पण्या