खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण पूर्वेकडील दादासाहेब क्रीडांगण येथे जय शंकर क्रीडा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत कल्याण डोंबिवली ,नवी मुंबई , भिवंडी, शहापूर ,ठाणे ,वाशिंद ,सह ठाणे जिल्ह्यातून ९१ संघांनी सहभाग घेतला आहे .स्पर्धेत महिलांच्या २६ संघानी सहभाग घेतला.कल्याण डोंबिवली मधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण डोंबिवली मध्ये महापालिकेच्या माध्यमातून ५० मैदाने उपलब्ध करून देणार असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.पुढे खासदार डॉ. शिंदे म्हणाले, कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधी नंतर सर्व गोष्टी पूर्व पदावर येत असताना अशा स्पर्धांची आवश्यकता आहे.अशा स्पर्धाच्या माध्यमातून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते.अशाच स्पर्धाच्या माध्यमातून प्रो कबड्डी मध्ये चांगले खेळाडू मिळू शकतील . प्रो कबड्डीच्या ₹विविध राज्याच्या संघात ठाणे जिल्हा तसच कल्याण डोंबिवली मधून खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धाची गरज आहे. सलग चार दिवस ही स्पर्धा होणार आहे .
बाईट :- डॉ.श्रीकांत शिंदे ( शिवसेना खासदार )


0 टिप्पण्या