*कोल्हापूर पोटनिवडणुकीतील विजयाचा आनंद डोंबिवलीत पेढे वाटून



डोंबिवली ( शंकर जाधव ) 

कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस उमेदवार श जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला असून हा विजय म्हणजे उत्तर कोल्हापूर विधानसभे मधील जनतेने महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर विश्वास दर्शविला आहे असे सांगत डोंबिवलीत शिवसैनिकांनी पेढे वाटून व्यक्त केला.

  यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले,   भाजपा आणि त्यांचे इतर बेगडी हिंदुत्व जोपासणारे मित्र पक्षाच्या वाढती महागाई ,धर्मांध राजकारण व विनाकारण हिंदू मुस्लिम दुही पसरवणाऱ्या भोंग्याच्या कुबड्या घेणाऱ्या व इडीचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपा ला कोल्हापूर करांनी सपशेल नाकारले .भोंग्याचा राजकारणाला उत्तर कोल्हापूरच्या नागरिकांनी ठेंगा दाखवला....

महाविकास आघाडीच्या उमेदवार श जयश्री जाधव यांच्या विजयाचा जल्लोष शिवसेना डोंबिवली शाखेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांना पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटून व फटाके फोडून साजरा केला.

विजयी जल्लोष साजरा करताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम विधानसभा संघटक तात्यासाहेब माने,विजय देशमुख उपशहर प्रमुख किशोर मानकामे विवेक खामकर,दीपक भोसले, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, सचिन जोशी, संदीप नाईक या पदाधिकार्‍यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या