अमूल्य मताधिकाराचे अवमूल्यन




 भारतीय संसदीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी, हक्क व अधिकार या सकारात्मक देणगिने  मतदानाचा अमूल्य सहभाग सर्व नागरिकास दिलेला आहे. मतदानाचा हा अमूल्य अधिकार कुणाला द्यावा याबद्दल गतकाळात अनेक चर्चा, वाद, विवाद ,संवाद झाले असतील याबद्दल जाणकार व्यक्तीस न सांगणे बरे. भारताचा प्राचीन व अति प्राचीन इतिहास पाहिला असता अनेक माध्यमातून तसेच श्रुत व प्रत्यक्ष आजच्या अनेक भग्न अवशेषांमधुन आपणास निदर्शनास येईल की भारतात राजेशाही पद्धत असावी .वंशपरंपरागत मानवास राजसत्ता, आर्थिक सत्ता ,धार्मिक सत्ता, सामाजिक सत्ता ,कौटुंबिक सत्ता ही तो सक्षम ,प्रबळ अथवा साजेसा असो किंवा नसो प्राप्त होत असे.


 राजेशाही पद्धतीमध्ये वारसा हक्क मिळावा म्हणून विविध भागात प्रचंड तर अतिप्रचंड संघर्ष झालेले आहेत व त्यातून खूपच मोठ्या प्रमाणात नरसंहार होऊन काही ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब तसेच वंशच्या - वंशच नष्ट झालेले आहेत. अशा तर्‍हेच्या इतिहास भारताच्या पाठीशी असल्याकारणाने जगातील सर्वाधिक मोठी संविधानिक संसदीय प्रणाली ने भारतीय नागरिकास अमूल्य असा श्रीमंत ,गरीब , स्री, पुरुष, जाती ,धर्म शारीरिक व्याधी ,भेदभाव रहित मताधिकार दिला आहे .


मतदानाचा अधिकार प्राप्त होण्या अगोदर शासन कर्ता हा वंशपरंपरागत आईच्या पोटी जन्म घेत होता . लोकशाही व्यवस्थेने सामान्य माणूस आपला शासन कर्ता कोण असावा हे मतपेटीच्या माध्यमाने आपला सारखा सामान्य मतदार ज्या मता धिकाराने ठरवितो त्या अमूल्य असे मताधिकाराचे अवमूल्यन होण्याचे अनेक कारणे असू शकतात. ते व्यक्तिपरत्वे ,स्थानपरत्वे , काळपरत्वे, विचार परत्वे ,गरज परत्वे, वंश, जात, धर्म ,संबंधपरत्वे वेगवेगळे असायला वाव आहे. परंतु ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला अधिकार प्राप्त झाला आहे, ज्याला दिले त्याचे महत्व न कळण्यासारखे तो खास करून अधिकचा अवमूल्यन करणारा असला पाहिजे . त्यातही आपण खेड्यातील ग्रामीण मतदार व शहरी मतदार अशी देखील तफावत करू शकतो.


 एकंदरीतच काही सर्वेक्षणावरून भेटी, मुलाखती ,मानवी संवादा वरून असे  नजरेस येऊन अंतिम निर्णयाप्रत सरकत असताना वाटते की ग्रामीण मतदारापेक्षा शहरी मतदार हा जास्त प्रकल्प, विचारप्रवण ,तसेच अभ्यासू मतदार आहे, याच्या उलट ग्रामीण मतदार हा काही अं शी अशिक्षित, पारंपारिक लोकराज राखणारा, संबंध जोपासू असणारा परंतु जगवेग बरोबरत पिछाडीवर राहुन मर्यादित गरजेवर उदर निर्वाह करणारा व याउलट शहरी मतदार आधुनिक जीवनशैली जगत असताना देखील  दोन्हीही  मतदारांकडून मताधिकारचे अवमूल्यनात फारसा फरक आढळत नाही.


 भारताचा भौगोलिक दृष्ट्या विशाल  भूभाग असल्याकारणाने भारतात वैचारिक ,सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ,आर्थिक अश्या संमिश्र विविधता समोर येत असतात व या सर्व घटकांचा परिणाम हा मतदान प्रक्रियेवर तसेच मतदारवर झाल्याखेरीज राहत नाही . भारतातील विशिष्ट भागात घडलेल्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून ज्या घटनेचा भारताच्या दुसऱ्या टोकावर वास्तव्यास असणाऱ्या सामान्य मतदाराचा काहीही संबंध नसताना त्याच्याशी तो जोडला जात असतो व त्या सामान्य मतदारांच्या मनात प्रचार - प्रसार माध्यमाद्वारे गैरसमज निर्माण केले जात असतात .भारतीय सामान्य माणूस भावनिक तथा कोणत्याही गोष्टीची शहानिशा, पडताळणी न करता स्वीकारणारा असल्याकारणाने लगेच काही मोठ-  मोठ्या लोकांच्या सत्तास्थानी, सुगंधी तसेच आखीव-रेखीव कपडे घातलेले लोकांच्या फसव्या तसेच अतिउत्साही भाषेच्या आमिषाला बळी पडून आपले अमूल्य मतदान नको त्या ठिकाणी वाया घालवत असतात.


 ज्या घटनेचा आपल्या गरजांवर , दैनंदिन समस्या वर काहीही परिणाम होणार नाही अथवा येणाऱ्या भावी पिढीसाठी त्याचा काहीही सकारात्मक परिणाम होणार नाही अशा पूर्वग्रहदूषित , विशिष्ट विचार मतप्रवाहवर आधारित व्यवस्थेचा प्रचार - प्रसार करणारा काही प्रमाणात अजाण असणारा ज्याला स्वतःचा देखील फायदा-तोटा माहीत नसणारा व विशिष्ट विचारधारे वाल्यांनी त्यालाही न समजू देता त्याचा उपयोग करून घेतला जात आहे अश्या व्यक्तीच्या विधानावर विश्वास ठेवून त्याला आपला माणून की जो आपल्या गरजवंत लोकांचा विचार डोक्यात न ठेवता फक्त आणि फक्त विशिष्ट  अकल्याणकारी, स्वार्थी विचारधारेशी बांधील असलेल्या, विशिष्ट माणव समूहाच्या चकाकणाऱ्या ,गोजिरवाण्या शब्दजालात अडकुन सारासार विचारा अभावी ,भविष्यातील योजनांविषयी जागृत नसणारा ,आपला परका हे समजण्यात गफलत करणारा अलगत आपले अमूल्य मतदानाचे अवमुल्यन अजाणतेपणी करून घेत असतो .


                हेमकांत मोरे.

                     नंदुरबार .

           94 23 91 70 74

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या