दिव्यात भाजपच्या वतीने पाणीटंचाई विरोधात वॉटर,मीटर गटर आंदोलन
दिवा ( शंकर जाधव ) दिवा शहरातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी भाजपने वारंवार प्रशासनाने पत्रव्यवहार केलेत.मात्र प्रशासना जागे होत नसल्याने भाजपने गुरुवारी आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली दिवा टर्निंग येथे पालिका प्रशासन व सत्ताधारी यांचा निषेध करण्यासाठी 'वॉटर मीटर गटर' निषेध आंदोलन केले.
आंदोलनात सहभागी झालेले आमदार डावखरे यांनी पाणी टंचाईच्या परिस्थितीला शिवसेनेला जबाबदार ठरविले.ते म्हणाले,दिवेकरांना सातत्याने दिशाभूल करण्याचे काम गेली बरीच वर्षे शिवसेनेकडून केले जात आहे.खऱ्या अर्थाने दिव्यातील जनतेने शिवसेनेला भरभरून दिले.मात्र शिवसेनेने दिव्याला फक्त लुटण्याचे काम केले आहे.आमदार संजय केळकर यांनी 'वाँर विथ टँकरलॉबी' हा जो एल्गार दिला आहे तो खऱ्या अर्थाने सुरुवात दिवा शहरातून होत आहे.शिवसेनेने फक्त आणि फक्त सत्तेचा वापर करत दिवेकरांना लुटण्याचे काम केले आहे त्याला काही दिवसात शिवसेना काही दिवसात त्यांची जागा दाखवून देतील.
यावेळी नगरसेवक संजय वाघूळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष एकनाथ भगत , विश्वास भालेराव,दिवा भाजपचे रोहिदास मुंडे, अशोक पाटील विजय भोईर,नरेश पवार, गणेश भगत, सचिन भोईर,रोशन भगत,अंकुश मढवी, युवराज यादव,समीर चव्हाण,जयदीप भोईर,नागेश पवार,वीरेंद्र गुप्ता,प्रशांत अबोणकर,माजी महिला अध्यक्षा सौ.सीमा भगत,राजश्री मुंडे,रेश्मा पवार,शीला गुप्ता आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या