चेंबूरच्या गणेश नगर व नालंदा नगरात उभारलेल्या
नवीन शौचालयांचे लोकार्पण
मुंबई- चेंबूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या आमदार निधीतून आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार चेंबूर कॅम्प येथील गणेश नगर आणि नालंदा नगर येथे नवीन शौचालये बांधण्यात आली आहेत. या दोन्ही शौचालयांचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी आमदार प्रकाश फातर्पेकर,माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर,चेंबूर विधानसभा संघटक संजय नटे आणि स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात विविध विकासकामे पूर्ण करून त्यांचे प्रत्यक्ष लोकार्पण करण्याचा जणू सपाटा लावला आहे.त्याचप्रमाणे माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांनीही लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमाची दखल राज्य महिला आयोगाने अलीकडेच त्यांची आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.तसेच त्या युवासेना महिला कार्यकारिणी सदस्य आणि चेंबूर विधानसभा संघटक पदावरही कार्यरत आहेत.

0 टिप्पण्या