साकुर ते बिरेवाडी रस्ता लवकरच होणार खड्डेमुक्त शिवप्रतिष्ठाणच्या व्रुक्षलागवड आंदोलनाला यश...
मा.श्री.काशिनाथजी दाते सर सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती, जि.प.अ.नगर यांचे निधीतून १५लाख रुपये
निधीची तरतूद...जि.प.अ.नगर अंतर्गत साकुर ते बिरेवाडी फाटा रोड(५किमी)
सदर रोड गेली २०१९पर्यंत मागील २५वर्षांत दरपंचवार्षिक १किमी प्रमाणे पुर्ण झाला.... त्यानंतर पुन्हा ०/० ते १/० किमीचे काम ६ महिन्यापुर्वी झाले. उर्वरित १/० ते २/५ रस्ता खड्डे दुरुस्ती व अस्तरीकरण साठी रु.१५लाख निधी उपलब्ध झाला आहे लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती सबंधित विभागाकडून देण्यात आली असल्याचे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी सांगितले. साकुर ते बिरेवाडी फाटा या रोडवर सदैव शाळकरी विद्यार्थी, शेतकरी बांधव, मालवाहतूक साधने यांची वर्दळ असते. कौठेमलकापुर, वरवंडी, खांबे, म्हैसगाव, पानोडी, शिबलापुर परिसरातील नागरिकांना बिरेवाडी मार्गे साकुर असा सोईस्कर रस्ता पण खड्डेमय रस्त्यावर गाडी चालवणे अतिशय जोखमीचे होते.
सदरच्या साकुर ते बिरेवाडी व पठार भागातील ईतर खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी वेळोवेळी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. व्रुक्षलागवड आंदोलन करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन महीन्यांपुर्वी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारमध्ये निधी उपलब्धतेनंतर काम सुरू होईल असे सांगितले तसेच पुढील विकास आराखड्यात सबंधित रस्त्यांची पाहणी करुन सदर काम सामाविष्ट करावे असे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांना सुचित केले होते.
जि.प.बांधकाम विभाग सभापती श्री.काशीनाथ दाते सर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने समस्त ग्रामस्थ बिरेवाडी यांच्या वतीने विशेष हार्दिक अभिनंदन...
0 टिप्पण्या