एसटीच्या संपात सहभागी बसचालकांचे कुटुंबीय बसचालक विकतातय भाजीपाला
कल्याण ( शंकर जाधव ) गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अजूनही संपला नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी बस डेपोचे संपात सहभागी चालक वाहक हे दोन्ही काम करणारे प्रमोद चिमणे यांनी कुटुंबावरील उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी हातगाडीवर ते भाजीपाला विकत आहेत .प्रमोद चिमणे हे डोंबिवलीनजीकच्या निळजे गाव परिसरात राहतात . त्याचा पत्नीसह दोन मुलांचा संसार आहे .चिमणे हे महामंडळात २०१७ साली कामाला लागले . संपापूर्वी काम करून त्यांच्या हाती १२ हजार रुपयांचा पगार येत होता .मात्र संपा नंतर पगार मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंब्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत असल्याने आता त्याने भाजी विकण्याचा धंदा सुरू केला असुन आता त्यांना दिवसाला दोन ते तीनशे रुपये भाजीपाला विकून सुटतात . त्यावर त्यांच्या कुटुंबाचा गाडा ते कसाबसा हाकत आहेत .मात्र जो जोपर्यंत संपाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिकाही या वेळेस चिमणे यांनी मांडली आहे .त्यामुळे यावर आता राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

0 टिप्पण्या