जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचा सत्कार समारंभ संपन्न


 जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचा सत्कार समारंभ संपन्न

उरण - दि.२४, जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या रायगड जिल्हा युनिटच्या वतीने दि.२३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी Online वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन संघटनेचे रायगड जिल्हा युनिटचे अध्यक्ष मान.श्री.नरेश मोकाशी, सरचिटणीस श्री.बबन पाटील, उरण तालुका संपर्कप्रमुख श्री.निर्भय म्हात्रे, उपाध्यक्ष श्री. रमणिक म्हात्रे व इतर पदाधिकारी यांनी केले होते.

यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार 


   सदर स्पर्धेतील विजयी शिक्षक व विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ  आज दि.२४ जानेवारी रोजी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे संस्थापक राज्याध्यक्ष मान.श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषद शाळा कोप्रोली येथे संपन्न झाला.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.श्री.विजय पाटील यांच्या हस्ते प्रमुख विजेते शिक्षक व विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  संघटनेचे राज्य खजिनदार मान. श्री रामदास हंजनकर, राज्य उपाध्यक्षा  मान. श्रीम. स्मिता गाजुल, मान.श्रीम. जयश्री दडस व कार्यालयीन चिटणीस मान.श्रीम. गीता राणे उपस्थित होत्या.

    यावेळी उरण पंचायत समिती सभापती मान.श्रीम.समिधा म्हात्रे , उपसभापती मान. श्रीम. बगाटे , उपजिल्हाप्रमुख श्री.नरेश रहाळकर तालुका प्रमुख श्री.संतोष ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

       आजचा हा कार्यक्रम संघटनेसाठी अभिमानास्पद क्षण होता. यानिमित्ताने संघटनेचे नाव समस्त रायगड जिल्ह्यात होईल अशी खात्री आहे.आगामी काळात  अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविण्याचा संघटनेचा मानस असल्याचे रायगड युनिट अध्यक्ष श्री. नरेश मोकाशी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या