मायेची चादरीने गरिबीची थंडी दूर करू, मकर संक्राती निमित्त स्तुत्य उपक्रम

मायेची चादरीने गरिबीची थंडी दूर करू 
 मकर संक्राती निमित्त स्तुत्य उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव )  आपल्या संस्कृतीत मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू केले जाते आणि त्या निमित्याने वस्तूरुपाने वाण सुद्धा दिले जाते. रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवास आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था आणि अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे वतीने एक वेगळे रुप देऊन सामाजिक मकर संक्रमण घडवून आणण्यात आले. डॉ योगेश जोशी आणि हेमंत नेहते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात डोंबिवली पूर्व येथील सावली बेघर निवारा केंद्रातील गरीब मजूरांना मायेची चादर वितरीत करण्यात आली. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सावली निवारा केंद्र बेघर वस्तीतील महिला आणि पुरुषांना   सोलापुरी चादर, तिळगुळ आणि नाष्टा देऊन संक्रांतीचे वाण लुटण्यात आले.  या उपक्रमासाठी  विलास पाटील , डॉ. गिरीश महाजन ,  डॉ योगेश जोशी , हेमंत नेहते , जयश्री कुलकर्णी , आरती मुळे, नीता नेहेते , आत्माराम घाग , दिलीप भानुशाली , हार्दिका नेहेते  आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुकृपा विकास संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांचे हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तर डॉ योगेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय तिडके, सतीश धुरी,जयंत भावे , वैभव धनावडे , निलिमा पाटील, मिलिंद खानोलकर यांच्या सहकार्याने  उपक्रम यशस्वी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या