चेंबूरच्या सार्वजनिक वाचनालयात भीषण आग !१० हजार पुस्तके खाक

चेंबूरच्या सार्वजनिक वाचनालयात भीषण आग !१० हजार पुस्तके खाक
मुंबई – गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि चेंबूरमधील डी.के.सांडू मार्गावर असलेल्या चेंबूर सार्वजनिक वाचनालयात काल रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण स्वरूपाच्या आगीची घटना घडली. या आगीत सुमारे १० हजार दुर्मिळ पुस्तकासह इतर साहित्य जळून भस्मसात झाले.सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने वाचनालयात कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

चेंबूर पूर्व भागात रेल्वे स्थाकापासून काही अंतरावर हे चेंबूर सार्वजनिक वाचनालय आहे.या वाचनालयात विविध विषयांवरील २२ ते २५ हजार पुस्तके होती.मात्र पोलीस पंचनाम्यानुसार यातील किमान १० हजार दुर्मिळ पुस्तके जळून खाक झाल्याची माहिती चेंबूर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय सकपाळ यांनी दिली.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.चेंबूर पोलीस पुढील तपास करत आहेत. या आगीत पुस्तकांसह ४ संगणक,२ प्रिंटर, ५ खुर्च्या, पंख आणि इतर साहित्य आगीत भस्मसात झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या