प्लास्टिक पिशव्या कारवाई करताना पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कांदे फेकले ...
डोंबिवली( शंकर जाधव ) प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुधील मोकल व पथकावर संतापलेल्या व्यापाऱ्यांनी कांदे फेकल्याची घटना कल्याण मधील एपीएमसी मार्केट मध्ये घडली. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून शिवीगाळ केली होती.
या प्रकरणी तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.या घटनेचा म्यूनिसिपल कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू झाली आहे.सोमवरी आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केट मध्ये कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांचे पथक आशीर्वाद घालण्यास सुरुवात केली काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांचा संताप पाहून पालिकेचे पथक कारवाई करताच निघून गेले.महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे सहायक आयुक्त मोकल यांनी सांगितले.या घटनेचा म्युनिसिपल कामगार संघटनेने निषेध नोंदविला आहे.एपीएमसी मध्ये कारवाई हे आमचे काम नाही यासाठी एपीएमसीने स्वतंत्र पथक नेमले पाहिजे. हा हल्ल्याचा म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या