कल्याण डोंबिवली परिसरात 50 टक्के मुलाचे लसीकरण पूर्ण

 कल्याण डोंबिवली परिसरात 50 टक्के मुलाचे लसीकरण पूर्ण



१ टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज 


डोंबिवली ( शंकर जाधव )  शासनाने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्यानंतर मागील 4 दिवसात महापालिकेच्या आरोग्य विभागाने 50 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महापालिका क्षेत्रात 72  हजार मुलाचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले असून आतापर्यत 38 हजार मुलाना पहिला डोस देण्यात आला असून विद्यार्थ्याकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे 

कल्याण डोंबिवली परिसरात 50 टक्के मुलाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.


    कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रात 256  शाळा असून या शाळामध्ये 70 हजार विद्यार्थी 15 ते 18 वयोगटातील असून शाळाबाह्य विद्यार्थी 10 हजार असल्याचे गृहीत धरून पालिकेने लसीकरणाचे 80 हजाराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यातील 50 टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यत 3 जानेवारी रोजी 22 शाळामध्ये 4 जानेवारी रोजी 39 शाळामध्ये तर 4 जानेवारी रोजी 60 शाळामध्ये पालिकेने लसीकरण उपक्रम राबविले आहेत. शहरातील सर्व डॉक्टराशी संपर्क करत त्यांना ओमीक्रोनची माहिती देण्यात आली  आहे. रुग्णालयाशी, बालरोगतज्ञ, स्त्री रोग तज्ञ यांना त्यांची जबाबदारी समजावून दिली आहेत. लहान मुलांना गरोदर मातांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टराना मार्गदर्शन केले. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी कोरोना चाचणी करून घ्या. लागण झालेल्या सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाणार नाही. ज्यांना घरी सोय नाही त्यांनाच आयसोलेट केले जाईल. लहान मुलांना देखील गरज असेल तरच दवाखान्यात दाखल केले जाणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता करोना चाचणी करून घ्या असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या