अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार

कविता :







 अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार।।धृ।। 


काळ्या कुट्ट अंधारात मिणमिणत्या प्रकाशात वाट शोधीली ।

खाच-खळगे,काट्यातुनी बचावात्मक पाऊले टाकूनी कामे पार पाडली ।।

पण अनेक कामांत होऊनही सुधार....

 अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार।।१।। 


विस्तारलेल्या समाजास लेखणीने एकत्रित आणिले।

मने दुभंगलेल्या व्यक्तींही एका छताखाली बैसले ।।

पण बदल होऊनही दिसेना सुधार...

 अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार।।२।। 


शासन, प्रशासन यांच्यात दिसली नाहीं बरोबरी । 

सरकार व विरोधक यांच्यात चाले हेकेखोरी।।

यांमध्ये मात्र सामान्यांचे जीवन बेझार....

अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार।।३।। 


शिका, संघटित व्हा, नि संघर्ष करा बाबासाहेबांनी सांगितले।

महिलांना शिक्षणाची दारे खुली केली त्या महान सावित्रीबाई फुले।।

सागोसुत म्हणे शिकूनही आम्ही राहिलो निरक्षर .....

अजूनही डोळ्यांसमोर दिसतो आहे अंधार।।४।।


 कवी: सागोसुत-हरिसंतोष

(संतोष सावित्रीबाई गोपाळ सावंत) ,  

ठाणे, डोंबिवली (प) 8779172824

3 जानेवारी 2022 ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या