मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघा मार्फत नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी साहेबांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा.

 मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघा मार्फत नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी साहेबांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा.



माननीय युनूस पठाण साहेब यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवल्याने आज दिनांक 5/01/2022 रोजी मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ मार्फत भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले , भेटीदरम्यान   सेवा पुस्तक अद्यावत करण्याकामी तालुकास्तरावर कॅम्प लावण्या संबंधी चर्चा करण्यात आली,  12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व 24 वर्ष निवड श्रेणी संदर्भात चर्चा केली असता साहेब म्हणाले की या विषयाला प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहे,   पेन्शनर शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अंशराशीकरण मागणी प्रस्तावावर समाधानकारक चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान इतर विषयावर देखिल सकारात्मक बोलने झाले. काही दिवसापासून प्रलंबित असलेल प्रश्न  साहेबांची कामाची हातोटी पहाता निश्चितच मार्गी लागतील यात तिळमात्र शंका नाही.अभिनंदन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मा. हेमकांत मोरे सोबत , मा. रमेश बिरारे जिल्हा उपाध्यक्ष, मा.रामराज गायकवाड ,तसेच मा.प्रदीप वाघ उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या