दिव्यांग मुलांनी गायली गाणी... नृत्य करून जिंकली मने..

 





डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त  ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य कल्याण डोंबिवली महानगर पालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमान्वे  साधून  समान संधी दिवस नूतन विद्यालय कल्याण येथे दिव्यांग मुलांच्या वेशभूषा,  चित्रकला,  गायन,  नुत्य वादन वक्तृत्व  स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच दिव्यांग विध्यार्थाना गौरव  प्रमाणपत्र  देण्यात आले.  सदर  कार्यक्रमात विजय सरकटे,  शिक्षण विस्तार अधिकारी, चौधरी  आधिव्यख्यात, शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहाटोळी,  सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, जिल्हा समन्वयक अनिल कुराडे,   जिल्हा परिषद ठाणे समन्वयक अरुणा पाटील,   शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहाटोळी,  समन्वयक मिलिंद अहिरे,  डॉ.  संगीता गणवीर,  प्रांजल जाधव, समावेशित तज्ज्ञ व  सर्व विशेष शिक्षक नीलिमा खुंटले,  वंदना पिंगानें, मंगल बुरुंगले  प्रिया मिरगळ,  अनिता पाटील मीनाक्षी फुलपगारे  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या