_आझाद मैदानातील एसटी कामगारांसाठी आझाद हिंदची एक भाकर न्याय हक्क लढ्यासाठी....

 _आझाद मैदानातील एसटी कामगारांसाठी आझाद हिंदची एक भाकर न्याय हक्क लढ्यासाठी....



सविधान दिनापासून आझाद मैदानातील कामगारांच्या न्यायहक्क्काच्या लढाईत आझाद हिंद सामील....

    डाँ.अमित दुखंडे,प्रदेश संघटक 

    आझाद हिंद कामगार संघटना.


मुंबई:

आझाद मैदानातील एसटी कामगारांना न्यायहकाच्या ह्या लढ्यात पाणी आणि जेवण बंद केल्याने त्यांचे होणारे हाल पाहता राष्ट्रीय मिल मजदूर युनियनचे माजी अध्यक्ष कै. मधुकर कृष्णाजी परब यांचे नातु आणि आझाद हिंद कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक डॉ. अमित अनंत दुखंडे ह्यांच्या पुढाकाराने एक भाकर योजने अंतर्गत पाणी आणि जेवण देण्याचा उपक्रम आझाद   मैदानावर संविधान दिनापासून सुरू करण्यात आलेला आहे.


कष्टकरी कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्महत्या करण्याची वेळ येणे घृणास्पद आहे. न्याईक अधिकारासाठी संविधानिक अधिकारासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आझाद हिंद च्या 16 विंग्सने पाठिंबा जाहीर केलेला आहे. प्रत्येक एस. टी डेपोत जाऊन कामगारांना तसें निवेदन दिलेले आहें महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार नोव्हेंबरलाच निवेदन देऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कष्टकरी कामगारांचे न्याय हक्काचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आझाद हिंदने  4 नोव्हेंबर पासून राज्यव्यापी संपर्क अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रातल्या  कानाकोपऱ्यात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे स्वतः प्रत्यक्ष भेटी देत लढा विलीनीकरणाचा यशस्वी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे.


गावाखेड्यातून मुंबईत आलेल्या आझाद मैदान लढा देत असलेल्या कष्टकरी कामगारांना एक भाकर देण्याचा उपक्रम सविधान दिनापासून मुंबईतील आझाद हिंद कामगार संघटनेचे डॉ. दुखंडे यांना पुढे येऊन मदत करत आहेत आणि आपणही आझाद मैदानाजवळून जाणाऱ्या प्रत्येक जवाबदार कामावर जाणाऱ्या चाकरमानी, व्यापारी आणि सामाजिक संस्थानी एक नैतिक कर्तव्य दाखवून जमेल तशी एक तरी भाकरी, पाणी, चादर, मच्छर जाळी त्या कामगार आंदोलनाला द्यावी आणि त्यांना मदतीचा हाथ पुढे करावा तसेच आपणही आपल्या भागात  मदतीचे आव्हान करून ह्या लढ्यासाठी पुढाकार द्यावा असे जाहीर आव्हान एका पत्रकाद्वारे आझाद हिंद कामगार संघटनेचे प्रदेश संघटक डॉ.अमित दुखंडे यांनी जाहीर केली आहे,

--------------------------------

मुंबई/ कल्याण

दिनांक: 26 नोव्हेंबर 2021.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या