कविता- तुळस (प्रमोद न सूर्यवंशी)

विषय - तुळस 



पहाटे पहाटे पूजतो आपण

हळदं कुंकु लावुनं तुळसेला

सुख समाधान येते घर दारी

जस खंडोबा पावलां माळसेला ... ।। १ ।।


तुळस हे विठ्ठलाचे रंग रूप आहे

या वनस्पतीला मान कळसेचा 

डोक्यावरती घेऊनी वारी केली

रिंगनामध्ये घोड़या सोबत वळसेचा ..... ।। २ ।।


या वनस्पतीचे महत्त्व आहे खरच

रोग राई करते आपल्या पासून दूर

आयुर्वेदिक वनस्पती ही रोगाला 

निरोगी राहते आपले शरीर भरपूर ..... ।। ३ ।।


      प्रमोद न सूर्यवंशी - मालाड मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या