डोंबिवलीत महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा


     डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेना –राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकार बनवून दोन वर्ष पूर्ण झाली आहे.मात्र या तिन्ही पक्षात सत्तेच्या वाट्यासाठी भांडणे सुरु झाली आहे,राज्यात सार्वजनिक सेवा सुविधांचा पुरता बट्याबोल उडला आहे. आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे,एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली, वीज बिलात भरमसाठ वाढ, रस्त्यांची दुरावस्था या सर्वाला हे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.महाविकास आघाडी सरकारला याचा जाब विचारण्यासाठी  डोंबिवलीत भाजपा जनआक्रोश मोर्चा काढणार आहे.गुरुवारी सकाळी १० वाजता डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर ते डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्च्याचे नेतुत्व आमदार रविंद्र चव्हाण करणार असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या