कंगनाचे भारतीय नागरीकत्व रद्द करा अखिल भारतीय वडार समाज संघटनेची मागणी

 कंगनाचे भारतीय नागरीकत्व रद्द करा 

अखिल भारतीय वडार समाज संघटनेची मागणी


मुंबई -  बाॅलीवूडमधील कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्याची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले. १९४७चे स्वातंत्र्य ही भीक होती, अशी गरळ ओकली आहे. त्यामुळे तिचा खरपूस समाचार घेवून तिचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे,अशी मागणी अखिल भारतीय वडार समाजाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

यासंदर्भात अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे अध्यक्ष दीपकदादा शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो भारतीयांनी बलीदान दिले आहे त्यामध्ये वडार समाजानेही भरीव योगदान दिले आहे.तरी कंगना राणावत ही एक अभिनेत्री आहे.तिने स्वातंत्र्याचा अपमान करून देशद्रोही वक्तव्य केले आहे,याचे तिने भान राखावे ,उगाच नुसत्या भानगडी करू नये, असा इशाराच शिंदे यांनी कंगनाला दिला आहे.  

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या