कल्याण न्यायालया तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी

 अमृत महोत्सवानिमित्त जनजागृतीपर  प्रभात फेरी 




डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निर्देशानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी  कल्याण तालुका विधी सेवा समितीच्या वतीने  शहरात आज सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रभात फेरीमध्ये कल्याण जिल्हा व सत्र  न्यायालयाचे न्यायाधीश  २ शिवाजी कचरे व  कल्याण दिवाणी तसेच फौजदारी न्यायालयाचे सर्व न्यायाधीश न्यायालयीन कर्मचारी ,वकील शहाड येथील देवजिभाई  विधि विद्यालयातील विद्यार्थी तसेच गोवेली येथील जीवनदीप विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि स्वयंसेवकानी सहभाग घेतला ही प्रभात फेरी कल्याण  न्यायालय ते  शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली. या प्रभात फेरी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय समोर लोकांमध्ये बेटी बचाव, बेटी पढाव ह्या जनजागृतीसाठी पथनाट्य ही  ठेवण्यात आले  कायदे विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने कल्याण विधी सेवा समिती मार्फत लोकअदालतचे महत्व पटवुन देत वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार कायदा, रॅंगिंग प्रतिबंधक कायदाव न्याय सर्वा साठी  यासारख्या कायद्याविषयी माहिती व जनजागृती करण्यासाठी माहिती फलक प्रदर्शित की व घोषणा देण्यात आल्या. त्याच बरोबर    समाजातील शेवटच्या घटका पर्यत विधी सेवा समिती मार्फत न्याय कसा उपलब्ध होऊ शकतो याची माहिती तळागाळातील सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने ही प्रभातफेरी काढण्यात आली असल्याची प्रतिक्रीया न्यायाधीश कचरे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या