डोंबिवली ( शंकर जाधव ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सबका साथ, सबका विकास ह्या धोरणांतर्गत, ई-श्रम कार्ड ही आणखी एक महत्त्वकांशी योजना राबवली जात आहे. भारतात आतापर्यंत तीन कोटींहुन अधिक ई - श्रम कार्ड नोंदणी झाली आहे.
भाजयुमोवतीने कल्याण जिल्ह्यात 'ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी' सुरुवात होत आहे. टिटवाळा, अंबरनाथ येथे हर्षल विभांडीक (आत्मनिर्भर भारत, महाराष्ट्र प्रदेश संयोजक) आणि विनय सावंत (आत्मनिर्भर भारत, कोंकण विभाग संयोजक) ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून १० हजार ई - श्रम कार्ड नोंदणी करण्याचे ठरले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी, ई - श्रम कार्ड नोंदणी होणार आहे. ह्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा, आपत्कालीन परिस्थितीत, केंद्र शासनाकडून मिळणारा विशेष निधी, व विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, टिटवाळा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाटील, भाजपा अंबरनाथ पूर्व मंडल अध्यक्ष अभिजित कारंजुले, अंबरनाथ युवा मोर्चा अध्यक्ष विक्रमसिंह राठोड, आत्मनिर्भर भारत कोंकण विभाग सहसंयोजक राखी बारोड, सुनिल राणा उपस्थित होते.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे व विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा ई - श्रम कार्ड नोंदणीचा मुख्य उद्देश आहे.

0 टिप्पण्या