विश्वनाथ पंडित
करोना काळात बंद असलेली रेल्वे प्लेटफॉर्म प्रवेश सुविधा मध्य रेल्वेने पुन्हा सुरू केली आहे मात्र पूर्वी केवळ दहा रुपये मूल्य असणारे तिकीट एकदम पाचपट वाढवून ते पन्नास रुपये केले हे संयुक्तिक वाटत नाही नव्हे प्रवाशाला हा फार मोठा भुर्दंड आहे. स्वतःचे कुटुंब किंवा जवळचे जेष्ठ नातेवाईक बाहेरगावी जाणार अथवा येणार असल्यासच त्यांच्या मदतीसाठी जावे लागते नाहीतर वेळ आहे कुणाला ? या साठी प्लॅटफॉर्म प्रवेश मूल्य रुपये पन्नास म्हणजे अतिच झाले. गर्दी कमी व्हावी यासाठी ही उपाययोजना असल्याचे समजते परंतु प्लॅटफॉर्मवर बिनकामाचे इतरजन कितीतरी फिरणारे दिसत असतात त्यांचा बंदोबस्त कठोरपणे व्हावा यात वाद नाही.परंतु केवळ नातेवाईकांना घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्याला प्रवेश तिकीट दर पन्नास रुपये ठेवण्यात आला आहे या चा मध्य रेल्वेने अवश्य पुनर्विचार करणे महत्त्वाचे आहे आणि दहा रुपये प्लॅटफॉर्म तिकीट योग्य वाटते. दुसरी लक्षणीय बाब म्हणजे पश्चिम रेल्वेचे यासाठी तीस रुपये दर आहे आणि मध्य रेल्वेचा पन्नास रुपये हे परस्पर विरोधी रेल्वेचे धोरण लक्ष वेधून घेते.

0 टिप्पण्या