मुंबई (विश्वनाथ पंडित) जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते, शिक्षक गणेश हिरवे यांच्या कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही घट स्थापने निमित्त गोर-गरीब,वंचित व रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या एकूण २५ कुटुंबांना किराणा किट(डाळ तांदूळ,गह,हरभरे,साबण,कोलगेट,ब्रश,मैगी,तिखट,हळद, बिस्किट,हसती दुनिया आणि मास्क) वाटप करण्यात आले.याआधी देखील विविध सण-उत्सव व घरगुती वाढदिवसाच्या निमित्ताने हिरवे परिवाराने शेकडो कटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले असून सामजिक जाणीव ठेवून आम्हला काम केल्याचे नक्कीच समाधान व आनंद मिळतो.आपल्या मिळकतीचा काही अंश भाग हा समाजासाठी असायलाच हवा असे सांगून यापुढेही आम्ही जमेल तसे सहकार्य करीत राहणार आहोतच असे हिरवे सरांनी सांगितले.रक्तदान करणे,मोफत पुस्तके वाटप,किराणा किट वाटप व इतर अनेक समाजपयोगी कामे नेहमीच गणेश हिरवे करीत असतात व त्यांच्या या कामाचे कौतुक नेहमीच नागरिकांनी केलेलं आहे.

0 टिप्पण्या