कल्याण स्कायवॉकवर चाकूचा धाक दाखवून लुटणार करणारे दोघे आरोपी अटकेत

 कल्याण स्कायवॉकवर चाकूचा धाक

दाखवून लुटमार करणारे दोघे आरोपी अटकेत



    डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण रेल्वे पूलावर एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन घेऊन पसार झालेल्या दोघा लुटमार करणाऱ्या आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक करून गजाआड केले.यातील एक आरोपी सराईत असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.तर दुसरा आरोपी अल्पवयीन असून त्याची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.


      मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सुधाकर भगत ( २०, नेवाळीपाडा, कल्याण ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर दुसरा अटक आरोपी अल्पवयीन आरोपी आहे. फिर्यादी मोलमजुरी करणारे रोहित धोत्रे हे ७ ऑगस्ट रोजी कल्याण रेल्वे स्थानक येथील कसारा बाजूकडील ब्रिजजवळ पश्चिमेकडील जाणाऱ्या स्कायवॉकच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते.या पुलावर आरोपी रोहित भगत व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी धोत्रे यांच्याजवळ गेले.आरोपी रोहित भगत याने त्याच्याजवळील चाकूचा धाक दाखवून धोत्रे यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पसार झाले.रोहित धोत्रे यांनी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हि घटना कैद झाली होती.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आणि गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोहित भगत याला राहत्या घरातून अटक केली.तर त्याच्या साथीदारालाहि अटक करण्यात आली.आरोपी रोहित भगत याच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात घरफोडी आणि कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. कल्याण रेल्वे पोलिसाच्या सहायक पोलीस निरीक्षक आर.आर.भरकट व तापस पथकाने हि कामगिरी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या