दारु साडी पे बिक जाओंगे ऐसा रस्ता पाओंगे
कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण -टिटवाळाला जोडणारा मुख्य रस्त्यावर खड्मुळे चाळण झाली असून त्या खड्डमुळे टिटवाळा परिसरात राहणाऱ्या नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ म्हणूनच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण टिटवाळा रोड वरील बल्यानी चौकात एक अनोखे आंदोलन केले आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दारू पे बीक जाओंगे ऐसा रस्ता पाओंगे, साडी पे बिक जाओंगे ऐसा रस्ता पाओंगे अश्या घोषणा देत बल्यानी ते टिटवाळा रस्त्यावर आंदोलन केले .यावेळी केडीएमसीकडून रस्त्याची डागडुजी तत्काळ हाती घेतली नाही तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला


0 टिप्पण्या