डोंबिवली ( शंकर जाधव )
उच्च न्यायाल्याने राज्य सरकारला सुनावत कोरोना महामारीच्या काळात आंदोलने आणि मोर्चे निघतातच कसे असा प्रश्न विचारला होता.याकडे राज्य सरकारने गांभीर्याने घेत आंदोलने आणि मोर्चे निघणार नाही याकरता पोलिसांना निर्देश दिले आहे.२ जुलै रोजी भाजपचा कल्याणच्या पालिका मुख्यालयात धडक मोर्चा होता.मात्र उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत मोर्चा स्थगित केला.मात्र दुसऱ्या दिवशी ३ जुलै ला राष्ट्रवादीने डोंबिवली पश्चिमेकडील दिन द्याल रोड येथे सकाळी ११ वाजता इंधन व घरगुती गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले आहे.राज्यातील सत्तेतील भागीदार असलेल्या आणि आरोग्य खाते व अनेक खात्यांचे मंत्रीपद असलेल्या राष्ट्रवादीला मात्र कोरोना महामारीचा विसर पडला कि काय असा प्रश्न जनतेला पडला आहे.मात्र सर्व पक्षांना आंदोलने आणि मोर्चे काढण्यास बंदी आणि राष्ट्रवादीला मात्र वेगळा न्याय कसा ? असा प्रश्न इतर पक्षांना पडला आहे.राष्ट्रवादीने या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना दिली. कार्यकर्ते जरी या आंदोलनात सहभागी होणार असले तरी कोरोना पसरू नये म्हणून साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.३ जुलै रोजी राष्ट्रवादीचे हे आंदोलन झाले तर पोलिसांनी या पक्षासमोर नमते घेतले असावे असा समज जनतेचा होऊ शकतो.

0 टिप्पण्या