नांदीवली पंचानंद येथील स्वामी समर्थ मठाजवळील नागरीकांच्या समस्येबाबत आमदार राजु पाटील यांनी केला पाहणी दौरा..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा या परीसरात कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यासाठी क.डों.म.पा. च्या सर्व अधिकारी वर्गाला आमदार राजु दादा पाटील यांनी आज घटनास्थळी बोलावले.
अधिकारी वर्गाकडून नेहमीची थातुरमातुर उत्तरे मिळाल्यानंतर आमदार राजु दादा पाटील यांनी सर्व नागरीकांसमोर त्यांची खरडपट्टी काढली, नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. या कडेही अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून त्यांची कानउघाडणी केली व तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले तसेच आमदार निधीतून तात्पुरत्या स्वरूपातील कामांसाठी निधी दिलाच पण कायमस्वरुपी नाले बांधण्यासाठी तब्बल १ कोटी चा निधी वर्ग करण्याचा मनोदय व्यक्त केला. परीसरातील नागरीकांची व्यथा समजताच त्या जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तत्काळ आल्याबद्दल परीसरातील नागरीकांनी आमदारांचे आभार मानले.
सदर पाहणी दौर्याच्यावेळी आमदार राजु पाटील,मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज घरत, हर्षद हरिश्चंद्र पाटील, महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, किरण वाघमारे, ड्रेनेज विभागाचे माधगुंडी, लीलाधर नारखेडे, प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार व परिसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या