राज्यात ७६०० कैद्यांना मिळाला लसीचा पहिला डोस..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात ७६०० कैद्यांना मिळाला लसीचा पहिला डोस त्यामुळे कोरोना रुग्ण कैद्यांची संख्याही घटली आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ४६ कारागृहांमध्ये ३३ हजार ८०० कैदी आहेत. यांपैकी १८०० कैदी जामिनावर बाहेर आहेत. आजपर्यंत राज्यात ७६०० कैद्यांना कोरोनाची पहिली लस मिळालेली आहे. ज्यात ५५७३ जणांवर खटला सुरु आहे तर, २०१७ कैदी हे सिद्ध गुन्हेगार आहेत.
महत्वाचं म्हणजे कारागृहात राहणाऱ्या कैद्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह केसेस लक्षणीयरीत्या कमी झालेल्या आहेत. गेल्या आठवड्यात १७० कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर या आठवड्यात हि संख्या अवघी ४५ आहे.


0 टिप्पण्या