कल्याण - डोंबिवली महापालिकेची "कचरा कुंडी ' हटाव मोहीम सुरू
कल्याण - नागरिकांना घंटा गाडीची सवय लागल्यास रस्ते कचरामुक्त होतील या हेतूने कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि उपयुक्त डॉ.कोकरे यांनी पालिकेच्या सर्व विभागात कचरा कुंडी हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्रामुख्याने डोंबिवली पश्चिम मधील साउथ इंडियन हायस्कुल ,मनपा रुग्णालय आणि मा दुर्गा व्हिला समोरील कचरा कुंडी हटवून रस्त्यावर कचरा टाकण्यास मज्जाव केला जात असल्याने हा संपुर्ण परिसर आता चकाचक स्वच्छ दिसत आहे. त्यासाठी पालिकेचे स्वछता निरीक्षक लांडगे व त्याचे कर्मचारी पथक ,
सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी घुटे, प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते आणि स्थानिक नगरसेवक वृषाली जोशी यांनी नागरिकांचे प्रबोधन केले.या स्वच्छता मोहिमेमूळे यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात नंबर लागण्याची अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करू लागले आहेत.


0 टिप्पण्या