४ जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन
डोंबिवली ( शंकर जाधव ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात अशी भूमिका घेत यासाठी १० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अश्या चार जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने प्रगती महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजप नेते तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील, समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, गंगाराम शेलार, संतोष केणे, अजुन चौधरी, भास्कर पाटील, गजानन मांगरूळकर, नंदू म्हात्रे, दत्तात्रय वझे, रंगनाथ ठाकूर, वसंत पाटील, १४ गाव विकास समितीचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे यांनी समितीची भूमिका स्पष्ट केली. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील म्हणाले, आम्ही राज्य सरकारला आपल्या मागणीचे पत्र पाठवले आहे. राज्य सरकारने आमच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारला तसे सांगणे आवश्यक आहे.१० जून रोजी कुठल्याही परिस्थितीत आम्ही मानवी साखळी करणारच. दि.बा.पाटील हे लोकनेते होते. त्यांनी नवी मुंबईत ओबीसी, भूमीपुत्र, सिडकोसह अन्य प्रकल्प बाधितांसाठी आंदोलन उभे केले. सर्व पक्षीय संघर्ष हक्क समितीने विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दयावे याबाबतची मागणी विद्यमान महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारकडून त्याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असे सांगितले. शिवसेनेकडून विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी केली जात आहे. ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. पण सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा.तसेच २४ जून रोजी सिडकोला साठ ते सत्तार हजार लोक घेराव घालणार आहोत असे ही पाटील यांनी सांगितले.तर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी सचिव संतोष केणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आदर मनात आहे. आम्हाला दोन्ही नेते सारखेच आहे. पण भूमीपुत्रचे नाव असावे. कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अनेक अडचणीतून काम करीत आहे. त्यामुळे ते यामधून ही योग्य मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीचे अर्जुनबुवा चौधरी म्हणाले, ओबीसी समाजासाठी दि.बा.पाटील लढले होते. नवी मुंबईत सिडको ज्या जमीनी संपादित केल्या त्या कवडी मोलने संपादित केल्या जात होत्या. त्या जनेतेला १२.३० टक्केने न्याय देण्याचे काम पाटील यांनी केले आहे. त्यामुळे दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे असे वाटते. शरद पवार हे दि.बा.पाटील यांच्याच नावाला प्राधन्य देतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या