महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न असणाऱ्या सर्व हॉस्पिटल मधील कोरोना उपचाराचे पैसे परत मिळणार…
संबंधित रुग्णांनी विहित नमुन्यात अर्ज करावे- शिवश्री राहुल ढेंबरे पाटील
कोविड रुग्णांना वैद्यकीय खर्चाची बिले मिळणार राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार घेतल्यानंतर त्यांच्याकडून आकारलेली बिले राज्य सरकारने परत मिळवून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करून समितीने रुग्णांच्या तक्रारीचे निवारण करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये कोविडवर मोफत उपचार देण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत दैनिक पुढारीने मागील महिन्यात खाजगी रुग्णालयात उपचार मिळतील का? या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली होती कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत असलेल्या रुग्णालयात रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले नाही, उच्च न्यायालयाने याबाबत सरकारी पक्षाला विचारणा केली असता राज्य शासनाने याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार व्हेंटिलेटर वरील आठ उपचारांसहित अन्य २० उपचार covid-19 रुग्णांना मोफत देण्याचे शपथपत्र दिले, त्यानंतर शासनाच्या शपथपत्रावर याचिकाकर्त्याने आक्षेप घेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयात मोफत उपचार देत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
रुग्णांनी पांढऱ्या/ पिवळ्या/ केशरी शिधापत्रिकांचे झेरॉक्स, रुग्णालयाला बिल भरलेल्या पावत्या, रुग्णाचे आधार कार्ड, कोविड रिपोर्ट्स विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल जमा करण्यासाठी काही अडचणी आल्यास माझा मोबाईल नंबर ९५७९७४५७७४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी केले आहे.
सदर माहिती गरजवंतांपर्यंत पोहचवा…
१) कोवीड ची बिले, २) आधार कार्ड ३) कोवीड रिपोर्ट्स
काही शंका / अडचण असल्यास कॉल किंवा मेसेज करा..
जनसेवक-शिवश्री राहुल ढेंबरे पाटील,संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, मो. 9579745774
0 टिप्पण्या