प्रतिनिधी: अवधुत सावंत
बदलापूर मध्ये ३ जून रात्रिच्या सुमारास बदलापूर शिरगाव एमआयडीसी परिसरात केमिकल वायूची गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या वायू गळतीमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. इतकेच नाही तर काही नागरिकांना उलट्या, पोटात मळमळ होण्याचाही त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.
बदलापूर एमआयडीसी भागात वायू गळती झाल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या वायू गळतीमुळे शिरगांव आपटेवाडी या परिसरातील अनेक रहिवाशांना श्वसनाचा त्रास झाला तर काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या भागात हवेत हा वायू पसरला होता. यासंबंधीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली.
0 टिप्पण्या