प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्र सरकारवर निषेध व्यक्त करताना नवाब मलिक म्हणाले, यापूर्वी असा दावा केला जात होता की डिसेंबरपर्यंत सर्वांना लसीकरण केले जाईल. मात्र आता अजून ८ महिने लागू शकतात असे वक्तव्य त्यांनी केले. अशा परिस्थितीत वेगवेगळी वक्तव्ये करण्यापेक्षा, लसीचे किती डोस कोणत्या राज्यात, कोणत्या तारखेला उपलब्ध होतील याची माहिती सरकारने देणे कधीही उत्तम. त्याचा संपूर्ण चार्ट लोकांसमोर ठेवायला हवा. यावर उत्तरादाखल भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की कोरोनाच्या दुसर्या लाटेत लसीची कमतरता होती हे खरे आहे कारण संसर्ग झपाट्याने वाढला होता. तरीही भारताने जागतिक विक्रम नोंदविला आहे.
आता लसींची कमतरता नाहीये, तर नवाब मलिक अंदाज बांधू शकतात की भारत कोणता विक्रम रचेल. ते पुढे म्हणाले की, देशात सर्वाधिक प्रमाणात लस देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आतापर्यंत, लसीचा कमीतकमी एक डोस इथल्या ३.११ कोटी लोकांना देण्यात आला आहे. यापैकी ६०.१४ लाख लोक असे आहेत ज्यांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. उत्तर प्रदेश दुसर्या क्रमांकावर आहे, जेथे आतापर्यंत ३.०४ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यूपीमध्ये भाजपचे सरकार असूनही केंद्र सरकारने महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस दिली. तरीही आघाडी सरकारचे लोक लस पुरवठा कमी होत असल्याचे सांगतात.
एकीकडे त्यांनी दररोज लस देण्याची रेकॉर्ड बनविण्याच्या ढोल बडवला तर दुसरीकडे केंद्रावर लस न दिल्याचा आरोपही त्यांनी केला. शेवटी त्यांनीही मान्य केले की सर्व लसी तर केंद्र सरकार देत आहे. त्यांचे काम फक्त योग्य पद्धतीने लोकांपर्यंत लस पोचविणे हे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला दोष देण्याऐवजी त्यांनी आता कामांवर लक्ष केंद्रित करायला हवे.


0 टिप्पण्या