प्रतिनिधी: अवधुत सावंत
देशभरात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पटनिक ही लस दिली जात आहे. पण आता देशातील नागरिकांना आणखीन एका लसीचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच भारतामध्ये चौथ्या लसीचा डोस उपलब्ध होणार आहे. आज डीसीजीआय (Drugs Controller General of India) ने मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आयातीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी देखील मंजुरी मिळू शकते.
मुंबईत स्थित असलेल्या 'सिप्ला' कंपनीने 'मॉडर्ना' लसीच्या आयात आणि मार्केट ओथॉरायजेशन साठी मंजुरीची मागणी केली होती. त्यानंतर डीसीजीआयने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० अंतर्गत नवीन औषधं आणि क्लिनिकल परीक्षण नियम २०१९ च्या तरतुदीनुसार, सिप्ला कंपनीला देशात आपात्कालीन वापराला मॉडर्ना कोरोना लस आयात करण्याची परवानगी दिली आहे.


0 टिप्पण्या