चेंबूरच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या विकासकाची नियुक्ती रद्द करा

आमदार फातर्फेकर यांची मंत्री आव्हाडांकडे मागणी




    मुंबई - चेंबूरमधील सुभाष नगर येथील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार  राज्याचे गृहमंत्री  जितेंद्र आव्हाड  यांनी गृह  सचिव गृहनिर्माण, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,म्हाडाचे मुख्य अधिकारी आणि स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या सोबत एक विशेष  बैठक आयोजित केली होती.


    या बैठकीत चेंबूरच्या या प्रकल्पातील आर.एन.ए. विकासकाची नियुक्ती रद्द करण्यात यावी हा महत्वाचा मुद्दा स्थानिक आमदार  प्रकाश फातर्पेकर यांनी मांडला. यावर सकारात्मक चर्चा करत ज्या सोसायट्या विकासकाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत इतर सोसायट्या  समाविष्ठ व्हाव्यात असे  मंत्री महोदयांनी  विधानसभा संघटक तथा सुभाष नगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष  संजय नटे यांना सांगितले. तसेच जादा चटईक्षेत्र देऊन वास्तूविशारद व कायदे सल्लागार यांच्या सोबतही चर्चा करून या विषयावर तत्काळ मार्ग काढावा असे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हाडा अधिकार्‍यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या