लस घेण्याआधी पेनकिलर्स घेऊ नका
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
मुंबई - कोरोनाची लस घेण्याआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लसीकरणानंतर जाणवणाऱ्या मात्र वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सोशल नेटवर्किंगवर कोरोना लसीकरणाच्या साईड इफेक्टसंदर्भात अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी लस घेतल्यानंतर पेनकिलर घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी देण्यात आली आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, लसीकरणानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर घेतल्यास हरकत नाही. लस घेण्याआधीच पेनकिलर्स घेतल्यास मात्र त्याचा विपरित परिणाम लसीच्या प्रभावावर होऊ शकतो. लस घेतल्यानंतर त्याचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून येतात. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी तसेच ताप असे इफेक्ट दिसून आले आहेत. त्यामुळे या परिणामांवर उपचार करण्यासाठी पेनकिलर किंवा पॅरासिटेमॉलचा वापर केला जाऊ शकतो,असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.


0 टिप्पण्या