गोवंडी कार्यालयातील नवीन शिधापत्रिका
वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप
मुंबई – गोवंडी शिधावाटप कार्यालय ४४ ई मध्ये कोरोना काळात वितरीत करण्यात आलेल्या नवीन शिधापत्रिका वाटपात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष मनोहर मेश्राम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे २ नोव्हेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कोरोना संक्रमण काळात व त्याआधीच्या काळातही वितरीत करण्यात करण्यात आलेल्या शिधापत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे.
मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार, नमूद कालावधीमध्ये ज्या आधारावर नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या .त्याचे संदर्भ पुरावे नमुना – ८ व नमुना – ९ अर्ज या कार्यालयातून नष्ट करण्यात या नवीन शिधापत्रिकांच्या बी – १ अर्जांना जोडलेले ‘ नाव कमी दाखले’ बनावट असल्यामुळेच सदर संदर्भ पुरावे नष्ट करण्यात आले आहेत.धक्कादायक बाब म्हणजे या बी-१ अर्जांना नाव कमी दाखले नेमके कुणी तयार केले असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे.खरे तर एकीकडे गोरगरीब लोकांना अशा कामासाठी आवश्यक ते सर्व पुरावे असतानाही ६ -६ महिने कार्यालयात फेऱ्या मारूनही त्यांची कामे होत नाही.तर दुसरीकडे असे गैरव्यवहार करून शिधापत्रिका दिल्या जात आहेत.तरी या प्रकरणाची तातडीने दक्षता पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी मनोहर मेश्राम यांनी केली आहे.तसेच आपली मागणी पूर्ण न केल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मेश्राम यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या