छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक क्रांती केली - राजेश मोरे

 



प्रतिनिधी: अवधुत सावंत


  छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक घटकातील वंचित, शोषित व पीडित घटकांना आरक्षण देऊन त्यांना सक्षम केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे सर्व समाज घटकांना शिक्षण घेता आले व ते स्वतःच्या पायावर उभे राहिले व आज जे बहुजन सबळ व सक्षम झाले आहे ते छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक क्रांतीमुळे असे मनोगत  शिवसेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष व कल्याण डोंबिवली मनपाचे माजी सभागृह नेते राजेश गोवर्धन मोरे यांनी डोंबिवलीत केले. राजेश मोरे यांनी जयंतीच्या शुभेच्छा देऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.


  प्रत्येक वर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा केला जातो या ही वर्षी ऑनलाईन साजरा करण्यात आला व त्याचे उदघाटन डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव उघडे, रिक्षा युनियन नेते रामा काकडे, रिक्षा युनियन नेते प्रदीप ढवळे, पंकज कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या